नवी दिल्ल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती सोमवारी करण्यात आली. त्या भारतीय परराष्ट्र सेवा विभागाच्या अधिकारी आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेच्या २०१४ च्या तुकडीतील त्या अधिकारी असून सध्या त्या पंतप्रधान कार्यालयाच्या उप सचिवपदी कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती. २९ मार्च रोजी या संदर्भातील आदेश काढण्यात आला होता. त्यानुसार त्यांची मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Fans
Followers